जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार यांचे प्रतिपादन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आष्टी-: विर बाबुराव शेडमाके यांचे कार्य देशभक्ती ला प्रेरना देणारे होते.असे मनोगत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी आष्टी जवळील ईलूर येथील विर बाबुराव शेडमाके यांच्या शहिद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच दिवाकर मडावी, माजी सरपंच तुळशिराम मडावी, प्रक्षीक बामनकर, ग्रा.प. सदस्य संतोष मडावी, हरीश मंगाम, एकनाथ आत्राम, प्रविन मडावी आदी मान्यवरांची उपस्थित होती.ईलूर येथे विर बाबुराव शेडमाके यांचे शाहिद दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.या प्रसंगी पुढे बोलताना भारतावर इंग्रजांचे राज्य असतांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना सळो की पळो करून सोडणारे बलाढ्य अश्या ब्रिटीश राजवटीला हादरा देणारे महान क्रांतिकारक विर बाबुराव शेडमाके यांना विरमरण आले त्यांचे कार्य आपण आपल्या मनात घेऊन जिद्दिने शासनास रेटा दिला तर आपल्या गावाचा आपणच विकास करु शकतो. असेही त्यांनी सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हरीश मंगाम यांनी केले.यावेळी परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.