कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : यावर्षी यवतमाळ जिल्ह्यांकरिता दिवाळी सुट्टी २०/१०/२०२२ ते ०२/१२/२०२२ पर्यंत जाहीर करण्यात आली होती.परंतु राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दिवाळी सुट्टी दिनांक २२/१०/२०२२ ते ०७/११/२०२२ पर्यंत जाहीर करण्यात आली होती. ही तफावत महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी आमदार किरणराव सरनाईक यांच्या लक्षात आणून दिली. यवतमाळ जिल्ह्या करिता सुद्धा दिवाळी सुट्टी दिनांक २२/१०/२०२२ ते ०७/११/ २०२२ पर्यंत वाढविण्यात यावी असे महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी आमदार किरणराव सरनाईक यांच्याकडे मागणी केली. आमदार किरण सरनाईक यांनी संघाच्या पत्राची तात्काळ दखल घेऊन अमरावती उपसंचालक यांना दिवाळी सुट्ट्यांबाबत पत्र दिले. आज जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मा. सूर्यवंशी यांनी आज पत्र काढून दिवाळी सुट्ट्या दिनांक २२/१०/ २०२२ ते ०७/११/२०२२ पर्यंत वाढल्याचे आदेश दिलेत. दिवाळी सुट्ट्या मध्ये वाढ केल्याबद्दल आमदार किरणराव सरनाईक साहेब, मा.उपसंचालक अमरावती,मा.शिक्षणाधिकारी यवतमाळ यांचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव,राज्य सहसरचिटणीस संजय चुनारकर, राज्यसंपर्क प्रमुख विनोद चव्हाण,विभागीय अध्यक्ष संतोष राठोड, विभागीय उपाध्यक्ष डॉ.विनोद डवले यांनी संघटनेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.