महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : खोकरी ग्रामपंचायत मधील आगरा गावात वसंता गणपती भोयर यांच्या घरासमोर ४ वाजता विज कडाडुन पडली त्यात मंजुला मधुकर भोयर ही महिला जखमी झाली ही माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी सर्व पदाधिकारी यांना सोबत घेवुन आगरा या गावी जावुन तेथील जखमी महिलेची विचार पुस करून तिला आर्थिक मदत केली . राष्ट्रवादी कॉंग्रेस चे ८०%टक्के समाजकारण २०%टक्के राजकारण हे विचार अंगिकृत कार्यकरणारा कार्यकर्ता म्हणुन भद्रावती तालुक्यात रोहणकर यांची ख्याति आहे.विज पडल्यामुळे आगरा गावातील वसंता भोयर यांच्या घराच्या भिंतीला भेगा पहडले राजूभोयर,पुरुषोत्तम भोयर,संतोष नागरकर,बंडु खामनकर, विनोद शभंरकर,सुभाष चैधरी, लोडबा खमनकर,इलेक्ट्रॉनिक सहित्य टी वि,फँन,चे नुकसान झाले करीता भद्रावती तहसीलदार सोनवणे साहेब याना भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने जखमी महिला व गावातील नागरीकांचे झालेले नुकसानाची शासनाकडुन त्वरित मदत ची मागणी केली अस्ता जखमीला मदत केले जाईल असे तहसिलदारांनी सांगितले.जखमी महिला ग्रामिण रुग्णालय येथे उपचार घेत आहे .जखमी महिलेला आर्थिक मदत देतेवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, मा जी विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी युवक चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष फयाज शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेस दिव्यांग सेल जिल्हा अध्यक्ष प्रा.राजेन्द्र ताजने, बिजोनि सरपंच मनीषा रोड,खोकरी सरपंच स्वनिल पानतोवने, दिपक वैद्य, सुरेश भोयर,पंकज वाढरे,संजु भोयर, उपस्थित होते.