महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती : येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा मंचचे सक्रिय कार्यकर्ते रवी गजाननराव पचारे यांना वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे आयोजित कार्यक्रमात पदवीदान समारंभात ग्रामगीताचार्य पदवी बहाल करून नुकतेच सन्मानित करण्यात आले.अ.भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरी अंतर्गत ग्रामगीता जिवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या मालिकेत अंतिम परीक्षा ग्रामगीताचार्य ही असते. त्यामधे वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांचे अभंग, ग्रामगीता,भजन, महाराजांचे वाड़्मय यांचा अभ्यास करुन अत्यंत कठीण व खडतर प्रक्रियेतून ग्रामगीताचार्य ही पदवी प्राप्त होत असते. सत्र २०२२-२३ मध्ये झालेल्या ग्रामगीताचार्य लेखी व प्रात्याक्षिक परीक्षेत भद्रावती येथील रवी पचारे हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, गुणपत्रिका व ग्रामगिताचार्य पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, रुपलाल कावळे, विशाल गावंडे, गुणवंत कुत्तरमारे,अशोक वैद्य, अनिल पिट्टलवार, गणेश वाणी, अतुल खापणे, दिपक कामडी, लक्ष्मण मंगाम, अक्षय डफ यांना दिले. या यशाबद्दल गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने रवी पचारे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.