कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : बातमी ईसापुर धरण दि.24/10/2022 कालवश कॉम्रेड कोंडबाराव थोरात यांना ईसापुर धरण येथे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या विचारांना,अभिवादन,करून स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले ईसापुर धरण या गावचे रहिवासी असलेले कोंडबाराव थोरात कॉम्रेड म्हणून ओळखले जातात त्यांना ढोलकी वाजवण्याची कला अवगत होती. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हटलं की ते शाहीर, प्रबोधनकार, अशा विविध अंगाने या पक्षाची संबंधित कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो व ते प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची विचारधारा समाजापुढे मांडत असतात अशापैकी ईसापुर धरण येथील कोंडबाराव थोरात हे कॉम्रेड म्हणून ओळखल्या जातात परंतु मराठवाड्यामध्ये कॉम्रेड असलेल्यां कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. परंतु, कोंडबाराव थोरात हे मात्र स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा यापासून अजूनही वंचित आहेत म्हणून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त इसापूर धरण येथील स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सभेच्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा याकरिता विविध कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले की कोंडबाराव थोरात यांना इतर कॉम्रेड कार्यकर्त्या प्रमाणे स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा मिळावा असे मत या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आले.या स्मृतीदिनाला प्रमुख म्हणून, ईसापुर धरण येथील सरपंच,कैलास नाईक, उपसरपंच भास्करराव थोरात, ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरात, व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कलावंत या स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी उपस्थित होणार आहेत.