अकोला,दि.28 – कोविड विषाणुचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रविवार दि. 28 नोव्हेंबरपासून संपुर्ण जिल्ह्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना याप्रमाणे :
१. कोविड अनुरुपवर्तनाचे (Covid Appropriate Behavior) पालन
राज्य शासनाने व केन्द्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे, सेवा प्रदाते, परिवास्तुंचे(जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादीसह सर्वानी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी कोटकोर पालन केले पाहिजे. कोविड अनुरुप वर्तनाची तपशिलवार मार्गदर्शकतत्वे तसेच त्यांचे उललंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरुप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या मापदंडानुसार असेल.
२. संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता
अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधीत असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (जसे की, खेळाडू, अभिनेते, इत्यादी) अभ्यागत, पाहूणे, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण केलेले असावे.
आ. जेथे जनतेतील कोणत्याही व्यक्तींनी येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन (मेळावे) इत्यादी ठिकाणी,संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.
इ. सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.
ई. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास ( https://epassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniverrsalPass Bot) हा, संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा, छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरीकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकिय व्यावसायाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल.
उ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी, संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.
३. महाराष्ट्र राज्यात प्रवास
कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंत व्यवस्थानावरुन राज्यात येणाऱ्या या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या संदेशाव्दारे विनियमन करण्यात येईल. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वेध असलेले आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र ते बाळगतील.
४. कोणत्याही कार्यक्रम, समारंभ, इत्यादींमधील उपस्थीतीवरील निर्बंध
अ. चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त/बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या समारंभाच्या/उपक्रमाच्या बाबतीत, जागेच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी राहील.
आ. संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या या बाबतीत, कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता. औपखरिकपणे आधीच निश्चित केलेले नसेल तर (स्टेडीयम प्रमाणे)संबंधीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरकणास, अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल.
इ. जर वरील नियामांनूसार कोणत्याही संमेलनासाठी ( मेळाव्यासाठी )उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या 1000 पेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठविल आणि तेथे वर नमूद केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड-19 च्या प्रसाराचा धोका लक्षात घेता, तेथे कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या उक्त प्रतिनिधीला, कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशतः बंद करण्याचे आदेश देण्याचा अधिकार असेल.
५. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे इतर वाजवी निर्बंध
कोणत्याही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास, जर योग्य वाटल्यास, कोणत्याही क्षणी, त्यांच्या संबंधीत अधीकार क्षेत्रासाठी, यात नमूद केलेले निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतू कमी करता येऊ शकणार नाहीत. मात्र जाहीर नोटीसीद्वारे 48 तासांची पूर्व सूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही. या आदेशाच्या दिनांकास अंमलात असलेले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लादलेले कोणतेही निंर्बध, जर ते पुढे चालु ठेवण्यासाठी जाहीर नोटीस देऊन पुन्हा जारी केले नसतील तर ते 48 तासांनंतर अंमलात असल्याचे बंद होतील.
६. संपूर्ण लसीकरणाची व्याख्या
संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ –
§ लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतलेल्या आहे आणि दुसरी मात्रा ( डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती, असा आहे किंवा
§ ज्या व्यक्तीचे वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा
§ 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती, असा आहे.
७. कोविडी अनुरूप वर्तनविषयक नियम व दंड –
कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड अनुरुप वर्तन (CAB) या संज्ञेची व्याख्या करता येऊ शकेल. ज्यांचे कोविड अनुरुप वर्तन म्हणून वर्णन केले जाते अशा अर्वनाच्या पैलूंमध्ये खाली नमूद केलेल्या वर्तनांचा समावेश होतो. आणि कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास जे अडथळा निर्माण करु शकतील अशा सर्व तर्कसंगंत पैलूंचा देखील समावेश होतो, त्यात नमूद केलेली त्याच्या प्रसाराची कार्यपध्दती(Methodology) दिलेले आहे.
मूलभूत कोविड अनुरुप वर्तनाचे काही पैलू पुढील प्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहीजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरात भेट देणारे अभ्यागत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरांमध्ये आणि व्यवसायाशी संबंधीत व्यवहार करतांना किंवा संबंधित संस्थेशी असलेली अन्य कार्य करतांना त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता संस्था उत्तरदायी असतील. संस्था, त्यांच्या नियंत्रणखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्ये करत असेल अशा सर्व ठिकाणी, अशा सर्वकर्मचाऱ्यांनी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक , इत्यादी गोष्टी उपलब्ध करण्यासाठी देखील जबाबदार आहेत.
१. नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करा. नाक व नोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहीजे. (रुमालाल मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल)
२. जेथे शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर राखा.
३. साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
४. साबणाने हात न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता नाक,डोळे,तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
५. योग्य श्वसन स्वच्छता (आरोग्य) राखा.
६. पृष्ठ भाग नियमितपणे वारंवार स्वच्छ व निर्जंतुक करा.
७. खोकतांना किंवा शिंकतांना, टिशूय पेपर नसेल तर, त्याने स्वतःचा हात नव्हे तर हातताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिंकावे.
८. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
९. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा आणि सुरक्षित अंतर (सहा फूट अंतर ) राखा.
१०. कोणलाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार किवा अभिवादन करा.
११. कोविड-19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले अन्य कोणतेही तर्कसंगत वर्तन.
८. शास्ती
§ या नियमांनुसार अपेक्षित असलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी पाचशे रुपये (500/-) इतका दंड करण्यात येईल.
§ ज्यांनी , आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादींवर कोविड अनुरूप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत ( जागेत) जर एखाद्या व्यक्तीने कसुर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड लाण्याव्यतिरिक्त, अशा संस्थांना आस्थपनांना सुध्दा 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. जर कोणहीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक इत्यादीमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण करण्याची सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आले तर, एक आपत्ती म्हणून कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
§ जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनने, कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यपध्दतीचे पालन करण्यास कसूर केली तर, ती प्रत्येक प्रसंगी रुपये 50 हजार रुपये इतक्या दंडास पात्र असेल वारंवार कसूर केल्यास कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.
§ जर कोणत्याही टॅक्सीमधील किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर कोविड अनुरुप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये इतका दंड करण्यात येईल, तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनिस, किंवा वाहक यांना देखील पाचशे रुपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत मालक परिवहन एजन्सीज, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोविड-19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक ऐजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
§ कोविड अनुरुप वर्तणुकीसंबंधीच्या वर नमूद केल्यानुसार दंड व शास्ती करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापपन अधिनियम – 2005 नुसार कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उल्लंघन करणाऱ्यावर इतर कोणताही दंड किंवा शास्ती लादता येईल. कोविड अनुरुपवर्तनाचे नियम /धोरणे वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरुप वर्तनाशी संबंधीत असणारे इतर कोणतेही विषय, मुद्दे, राज्य शासनाच्या अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/ आदेशांनुसार असतील.
कोविड नियमांचे उलंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश यापूढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक, महसूल विभाग तसेच ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका/नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा इनसीडेंट कमांडर, तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.
हे आदेश रविवार दि. 28 नोव्हेंबर पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्याकरिता लागू राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यईल.