नाशिक : सवलतीच्या दरात विविध प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यासाठी महापालिकेने 2017 मध्ये नियुक्त केलेल्या क्रस्ना लॅब वादाच्या भाेवऱ्यात सापडली असून बिटकाे रूग्णालयात एकाच व्यक्तीचे दाेन भिन्न रक्तगट निदान केल्याचे अहवाल समाेर आले आहेत. यासंदर्भात मनसेने पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर आयुक्त डाॅ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, त्यात तथ्य आढळल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डाॅ बापुसाहेब नागरगाेजे यांनी क्रस्ना लॅबला नाेटीसही दिली आहे. महापालिका रूग्णालयात गाेरगरीब रूग्ण येत असतात. त्यांना खासगी प्रयाेगशाळेत रक्त, लघवी तसेच अन्य शारीरीक चाचण्या करणे परवडत नाही. दुसरीकडे, पालिकेलाही लॅब चालवणे परवडत नसल्यामुळे 2017 मध्ये खासगीकरण करून क्रस्ना लॅबकडे विविध प्रकारच्या चाचण्या देण्याचे कंत्राट देण्यात आले.
या लॅबने पालिकेच्या चार माेठ्या रूग्णालयात तसेच माेठ्या प्राथमिक आराेग्य केंद्रांतून रक्त, लघवी व अन्य नमुने संकलीत करून डाॅ. झाकीर हुसेन रूग्णालयातील मुख्य लॅबकडे प्रत्यक्ष चिकित्सेसाठी पाठवण्याचा द्रविडी प्राणायम सुरू केला आहे. त्यात बऱ्याचवेळा एखादे सॅम्पल मिळाल्यानंतर त्यासाठी भला माेठा प्रवास करावा लागताे. तर कधी कधी जास्तीजास्त सॅम्पल संकलीत करण्यासाठी एकाच ठिकाणी अनेक काळ नमुनेही पडून राहत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पडून राहीलेल्या नमुन्यांचा अहवाल वैद्यकीयदृष्ट्या याेग्य हाेत नसल्याचा वैद्यकीय तज्ञांचा खासगीत दावा आहे. क्रस्ना लॅबबाबत नानाविध आराेप वा तक्रारी असताना एकाच व्यक्तीचे दाेन रक्तगट चाचणी अहवाल दिल्याची गंभीर बाब समाेर आली. मनसेचे शाम गाेहाड प्रशांत गांगुर्ड यांनी अायुक्त डाॅ पुलकुंडवार यांची भेट घेत चाैकशीची मागणी केली. आशुताेष निकम यांनी 15 नाेव्हेंबर 2022 राेजी रक्त गट तपासणी केल्यानंतर ‘एबी’ पाॅझीटिव्ह असे निदान झाले. याच निकम यांनी दुसरे सॅम्पल दिल्यानंतर त्यात बी पाॅझीटिव्ह असे रक्तगट निदान झाले. त्यामुळे भविष्यात चुकीचा रक्तगटामुळे रक्तदान वा रक्त घेण्याची वेळ अाल्यास जीवाशी खेळण्याचा प्रकार हाेवू शकताे. असाच प्रकार रामकृष्ण पाेरजे यांच्याबाबत घडला असून त्यांनी 10 नाेव्हेंबर राेजी रक्त तपासणी केल्यानंतर बी पाॅझीटिव्ह असा रक्तगट समाेर आला. दुसऱ्याच दिवशी नवीन सॅम्पल दिल्यावर ओ पाॅझीटिव्ह असा अहवाल आला.