शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : सध्याच्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, मराठा आरक्षण व विकास कामांना बाजुला ठेवुन विद्यमान सरकारच्या धोरणामुळे सामाजिक अस्वस्थता,व्देष व तेढ निर्माण झाली असुन सरकार सर्व आघाड्या वर अपयशी ठरले आहे, त्यामुळे समाजात सरकार विषयी प्रचंड असंतोष असुन जनमत महाविकास आघाडी च्या बाजुने आहे. त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी एकजुटीने कामे केल्यास येणाऱ्या काळात महाविकास आघाडी चा विजय निश्चित आहे. असे प्रतिपादन माजी आमदार विजय भांबळे यांनी केले. तालुक्यातील पावडे हादगाव शिवारात शनिवार काँग्रेस. १८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने आयोजित दिपावली-पाडव्यानिमित्त स्नेह- मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम नाना पाटील, प्रेक्षाताई भांबळे, हेमंतराव आडळकर, चक्रधर पौळ, अशोक नाना काकडे, रामराव उबाळे, पुरुषोत्तम पावडे, विनायकराव पावडे, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, अप्पासाहेब डख, गोरख भालेराव, माऊली राऊत, शैलेंद्र तोष्णीवाल, अनिल बरडे, रणजित गजमल, उदय रोडगे, निर्मलाताई लीपणे, कल्याण जोगदंड, बालासाहेब रोडगे, शिवराम कदम, विशाल देशमुख, रमेश डख, शेख दिलावर, सारंगधर महाराज, डॉ. डख साहेब, विनोद तरटे, संभाजी पवार, छगन शेरे, सिद्धू खोसे पाटील, राजेभाई दादा कदम, सचिन शिंदे, अजीम कादरी, मजीद बागवान, गौतम साळवे, लाला भाई, पप्पू शिंदे, नाना बोबडे, परवेज सौदागर, इरफान लाला, तोफिक भाई, ॲड.विष्णू ढोले,बाळासाहेब बोचरे, महमूद सर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अशोक काकडे,प्रेक्षा भांबळे,रामनाना पाटील,सारंगधर महाराज रोडगे,हेमंतराव आडळकर,सभापती चक्रधर पौळ, यांनीही सरकार च्या धोरणावर घणाघाती टिका करून एकत्रित काम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आवाहन केले. या कार्यक्रमासाठी सेलू तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य, आजी माजी पदाधिकारी तसेच नगरसेवक व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.