कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज दिनांक 20 नोव्हे. सोमवार रोजी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे गंज शहीद चौक मस्जिद परिसरात शेर ए हिंद शहिद टिपू सुलतान यांची २७३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.टिपू सुलतान यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यासोबतच समस्त मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.यामध्ये 60 ते 70 मुस्लिम बांधवांनी रक्तदान केले.आणि हाच उपक्रम आम्ही दरवर्षी राबवू असे त्यांनी बोलताना सांगितले.यामध्ये डॉक्टर काशीद कुरेशी,मोहंमद मुझमिल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.