पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
रामटेक तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या लोहडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदासाठी निवडून आलेले अनिकेत गजभिये आणि विनोद केळवदे या दोन्ही सदस्यांनी आज २० नोव्हेंबरला राज्याचे माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यावर विश्वास करीत त्यांच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यावेळी राजेंद्र मुळक यांनी काँग्रेसचा दुपट्टा घालून दोन्ही सदस्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.