प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने मनमाड (ता. नांदगाव, जिल्हा नाशिक) येथे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सकाळचे पत्रकार अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रिसरकारचे संपादक अशोक परदेशी, सरचिटणीस तथा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर, कोषाध्यक्ष तथा झी २४ तासचे प्रतिनिधी निलेश वाघ, सहसरचिटणीस तथा लोकमतचे पत्रकार अशोक बिदरी, सहसंघटक तथा साप्त. ठिणगीचे संपादक तुषार गोयल, सहकार्याध्यक्ष तथा पत्रिसरकारचे कार्यकारी संपादक उपाली परदेशी, साप्ता. लोकवजीरचे संपादक सॅमसन आव्हाड, सहकोषाध्यक्ष तथा प्रहारचे पत्रकार गणेश केदारे, सहसंघटक तथा जनआवाज न्युजचे संपादक अफरोज अत्तार, साप्त. ठिणगीचे पत्रकार आनंद बोथरा, तसेच नांदगाव मनमाड (ता. नांदगाव, जिल्हा नाशिक) येथे पोलिस निरीक्षक प्रतीम पाटील यांना निवेदन देताना कार्याध्यक्ष तथा लोकनामाचे पत्रकार अनिल आव्हाड, सहसरचिटणीस तथा लोकमतचे पत्रकार संजय मोरे, उपाध्यक्ष तथा दिनकरचे पत्रकार सोमनाथ घोंगाने, जेष्ठ पत्रकार तथा गणतंत्र न्युजचे संपादक प्रा. सुरेश नारायणे, प्रसिध्दी प्रमुख तथा लोकपर्व न्यूजचे संपादक प्रज्ञांनद जाधव, सदस्य तथा दी नाशिक हेरॉल्डचे पत्रकार निखिल मोरे.