प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव :मनमाड येथील साहित्यिक पत्रकार लेखक व छत्रे विद्यालयाचे उपमुख्याद्यापक संदीप देशपांडे यांच्या दंगल मामा या कवितेस देशाच्या राजधानीतून ११ हजार रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिल्ली येथील साहित्य अधिष्ठान समुहातर्फे हिंसाचार ,दंगली, तसेच अस्वस्थ परिस्थिती यावर विविध भाषांतून राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन ॴॅनलाईन करण्यात आले होते. मराठी भाषेतील संदिप देशपांडे यांची “दंगलनामा”या कवितेला पुरस्कार प्राप्त झाला आहे. संदिप देशपांडे यांनी दंगलीबाबतची अवस्था व भीषण परिस्थिती नेमक्या शब्दात मांडली असल्याचे निरीक्षण तज्ञ समितीने नोंदवले आहे. या पुरस्कार बद्दल संदिप देशपांडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


