प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
मेरी मिट्टी मेरा देश अभियाना अंतर्गत शनिवारी दि.१२ रोजी पाथरी नगरपरिषदेच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारक परिसरात ध्वजारोहण, शिलाफलक उद्घाटन, पंचप्रण व स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाईक यांचा सत्कार कार्यक्रम आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला .पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने यानिमित्ताने देशभरात वर्षभर अमृत महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान देशभरात राबविण्यात येत असून राज्यांमध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व मातृभूमीसाठी झटणारे व प्राणाची अहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता पाथरी नगरपरिषद मार्फत मेरी मिट्टी मेरा देश हे अभियाना अंतर्गत शनिवार दि.१२ रोजी सकाळी ११ वा. पाथरी शहरातील हुतात्मा स्मारक बळवंत वाचनालय येथे ध्वजारोहण कार्यक्र शीला फलक उद्घाटन, पंचप्रण शपथ स्वातंत्र्यसैनिक व त्यांची नातेवाईक यांचा सत्कार कार्यक्रम उद्घाटन आ. बाबा जानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नगर परिषद प्रशासक शैलेश लाहोटी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देविदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या नातेवाईकांचा आ. बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते सन्मान करण्यात पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे नातेवाईक गोविंदराव बन, सुदाम बोबडे, शेख इनुस शेख इस्माईल, सखाराम आहेरकर, भीमाशंकर मोरे, महमूद दादा मिया अन्सारी, किशन श्रीराम मोरे, इसाक शेख हयात, विशाल हनुमान शिंदे, शिवाजी चिंचणे, अँड अन्सारी जमील उर रहमान, ज्येष्ठ विधीज्ञ तथा माजी नगराध्यक्ष अँड . व्ही .एम. खेडेकर माजी.न.प. सदस्य सैफुद्दीन फारुकी, माजी. नगराध्यक्ष एम. एम .मोईज अन्सारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, माजी न.प. सदस्य नारायण पितळे, शेख मुस्तफा टेलर, राजेश पाटील, सुनील उन्हाळे, यांच्यासह आदींची उपस्थिती होती. बळीराम चव्हाण यांनी आभार मानले.