सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि १४ ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी परिसरात परळी वैजनाथ तालुक्यातील गुत्तेदार आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांच्या परळी अंबाजोगाई महामार्गावरील शेडमध्ये निर्घृणपणे खुन करण्यात आला या प्रकरणी परळी वैजनाथ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८/२०२३ कलम ३०२ /३४ आय पी एस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेचा तपास परळी वैजनाथ शहर पोलिस ठाण्याचे सपोनि सपकाळ करत असून आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांच्या खुन प्रकरणातील आरोपी दादर परिसरात असल्याचे लोकेशनच्या माध्यमातून समजले असता ए पीआय सपकाळ यांनी दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी ११: ४५ वा. एन सी केळकर रोडवरील हनुमान मंदिराजवळ त्याच्या मित्रासोबत आढळून आला आरोपी आणि त्याचा मित्र परिसरातून निघून जिण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच एपीआय सपकाळ यांनी तात्काळ कबूतरखाना येथील दादर वाहतूक विभागाचे कर्तव्यावर असणारे पोलिस हवालदार ९७०११६/ सुरेश भोसले हनुमान मंदिर सर्कलचे वाहतुक पोलिस हवालदार ३०८२३ यांना संशयित आरोपी पकडण्यासाठी सहकार्याची विनंती केली असता गांभीर्याता लक्षात घेत त्यांनी पानेरी जंक्शन येथील पोलिस हवालदार ९८०६३३/ सुधाकर पाटील यांना मदतीस घेऊन वाहतूक नियमांची कारवाई करण्याचा बहाना करत आरोपी आणि त्याच्या मित्रास तात्काळ ताब्यात घेतले असता एपीआय सपकाळ यांनी मुख्य नियंत्रण कक्षास मदत मागितली असता शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे गस्त घालणारे वाहन व बीट मार्शल येताच आरोपी महेश नामदेव रोडे वय २३ वर्ष व त्याचा मित्र सागर राजाराम इंगवले वय २३ या दोघांना ताब्यात घेऊन कार्यवाहीसाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून आत्माराम उर्फ बंडू मुंडे यांच्या खुन प्रकरणातील आरोपी फरार होते परंतु परळी वैजनाथ शहर पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी आणि मुंबई येथील दादर वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार १) ३०८२२ – श्री तुकाराम बिन्नर २) पोलिस हवालदार ९७०११६ – सुरेश भोसले ३) पोलिस हवालदार ९८०६३३ श्री सुधाकर पाटील यांनी खुनासारख्य गंभीर गुन्ह्यामधील फरार आरोपी जेरबंद केले.


