प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील लोकसंख्येने मोठे असलेल्या जातेगाव येथे दि. ११ व १२ ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस आमदार आपल्या दारी या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त मिळाला, या कार्यक्रमाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जून पाटील ( बंडू पाटील), सरपंच शांताबाई पवार, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अंकुश पगारे व युवा शिवसेना तालुकाप्रमुख श्री गुलाब चव्हाण, शाखाध्यक्ष मारुती सोनवणे, संतोष गायकवाड, भरत गायकवाड ज्येष्ठ नागरिक फकिरा भागवत आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
यावेळी विशेष करून जेष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांनी
नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीचा लाभ घेतला त्यापैकी दृष्टीदोष आढळून आलेल्या अनेक गरजू लाभार्थ्यांना मोफत नंबरचे चश्म्यांचे वितरण करण्यात आले. तसेच फिरत्या शासकीय सुविधा केंद्राचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नागरिकांकडून अधिकृत सर्व कागदपत्रांच्या आधारे मोफत शिधापत्रिका देखील देण्यात आल्या, तसेच जातीचे दाखले ८१ लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, ४५ लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, ७ लाभार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे इतर १५ शासकीय दाखल्यांचे देखल्यांचे वितरण करण्यात आले. फिरत्या आरोग्य तपासणी तपासणी अंतर्गत ११६५ लाभार्थ्यांना नेत्र तपासणी करून चश्म्यांचे वितरण करण्यात आले, व ६४ जेष्ठ नागरिकांना मोतीबिंदू असल्याने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सभापती अर्जून पाटील (बंडू पाटील) यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
मतदारसंघातील नांदगाव, मनमाड शहर तसेच सर्व गण व गट, आणि जवळपास वैयक्तिक ५० गावांमध्ये महाशिबिराचे आयोजन करून विविध सुविधा मोफत पुरविण्यात आल्या असून वरील उपक्रमा अंतर्गत जातेगाव व वसंत नगर तांडा येथील जवळपास १७२२ नागरीकांनी लाभ घेतला आहे, त्यामध्ये अनेक नागरिकांचे प्रलंबित वर्षापासून चे प्रश्न मार्गी लागले असल्याचे युवा सेनेचे गुलाब पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. दोन दिवस सुरू असलेल्या हे शिबिर यशस्वी होण्यासाठी शुभम आव्हाड, भरत गायकवाड, भाऊसाहेब चव्हाण एन. के. राठोड, वाल्मीक वरपे, एकनाथ चव्हाण, प्रकाश शिंदे ,गणेश खैरनार, महिंद्रा आहेर, सतीश बोरसे, सुशिल निकम नेत्ररोग तज्ञ डॉ दत्ता पालखेडे व डॉ आशा जगताप व स्थानिक आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशासेविका अंगणवाडी सेविका यांनी याप्रसंगी मदत केली.