प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव : नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव या विद्यालयाने छत्रे हायस्कूल मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यीनी कु वेदिका संजय जाधव हिने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर झेप घेतली.सदर विद्यार्थिनीला मार्गदर्शन विज्ञान शिक्षक शेवाळे ए.एस ,माताडे जी व्ही यांनी केले तसेच सर्व विज्ञान शिक्षकांचे सहकार्य लाभले. तिच्या या यशाबद्दल मविप्र नांदगाव तालुका संचालक अमितभाऊ बोरसे पाटील,गटशिक्षणाधिकारी चिंचोले साहेब ,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष बच्छाव सर ,मुख्याध्यापक गोटे डी.व्ही पर्यवेक्षक घुगे टि.एम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)