प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी, पाथरी
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदिप महाजन यांना स्थानीक आमदार किशोर पाटील यांनी बातमी का लावली म्हणून शिवीगाळ करत धमकी दिल्याची आॅडीओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. सदर अॅडिओ क्लिप आपलीच असल्याचे आ.पाटील यांनी मान्य केले असून त्यानंतर लगेच महाजन यांना भर चौकात काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. यात महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत,या प्रकरणी दोषी आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी व्हॉईस आॅफ मिडीया संघटना परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पाथरी, गंगाखेड, पूर्णा, जिंतूर, मानवत येथील व्हॉईस आॅफ मिडीया संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर मारहाण ही आ. किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारात दहशत निर्माण झाली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना मारहाण होणे हे लोशाहीला धरून नाही. याचा परभणी हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने निषेध नोंदण्यात आला. या घटनेमुळे पत्रकार व त्यांच्या कुटूंबात भितीचे वातावरण पसरले असून सदर घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी गावडे यांना दिलेल्या निवेदनावर व्हॉईस आॅफ मिडीया राज्य सहसरचिटणीस डॉ. ज्ञानेश्वर भाले, राज्य कार्यवाहक सुरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडीया, परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष प्रविण चौधरी, कैलास चव्हाण, सरचिटणीस श्रीकांत देशमुख, शेख मुबारक, मारोती जुंबडे, सय्यद युसुफ, नरहरी चौधरी, प्रदीप कांबळे, नेमीनाथ जैन, विवेक मुंदडा, के.डी. वर्मा, रामेश्वर शिंदे, दिलीप बोरूळ, अरूण रणखांबे, एम.डी. खंदारे, महेश कोकड, शैलेश काटकर, आकाशदिप लंगोटे, भुषण मोरे, संघपाल अढागळे, संजय घनसावंत, विश्वंभर तेलीअप्पा, बाळासाहेब घिके, मंदार कुलकर्णी, किरण गुंड आदिंच्या स्वाक्षरी आहेत.