प्रा.सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी, नांदगाव
नांदगाव: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० % शुल्क लागू केल्याने याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकऱ्यावर व व्यापारी वर्गावर होणार असून शासनाच्या जाचक निर्णया विरोधात आज जिल्हा व्यापारी असोसिएशन मिटिंग लासलगाव येथे जिल्हाअध्यक्ष श्री खंडूशेट देवरे यांच्या अध्यक्षते खाली होवून त्यामध्ये एकमताने मार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.तरी सर्व जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीच्या व्यापारी बांधवानी या बेमुदत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा असाशिएशन केले आहे .