कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे चंदनभाऊ कोहरे यांनी एक वेगळा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या भारताचे संविधान याचे पूजन करून तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, बीरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पण सोबत पुजण केले.अशा समाजसेवकाने सेवकाने आज हा निर्णय घेऊन आपल्या घराची वास्तुशांती केली आहे.याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.सोनाळा येथील सरपंच हर्षल खंडेलवाल व ग्रामपंचायत सदस्य मुशिर अली तसेच
जि.प.सदस्य प्रमोदभाऊ खोद्रे,प्रणव घोडेस्वार,साहेबराव वाघाडे,सतिश वानखडे,प्रवीण मेहनकार यांनी वास्तुशांती कार्यक्रमाला भेट देऊन समाजसेवक चंदन कोहरे यांचे कौतुक करून प्रतिमेचे पूजन केले.