सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी, अहमदनगर
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या पदी धनराज गुट्टे यांची निवड झाली आहे .या निवडीमुळे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे. धनराज गुट्टे मूळचे लातूरचे आहेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या सहवासात तयार झालेले युवक नेतृत्व आहेत. धनराज गुट्टे साहेब यांनी अखिल भारतीय वंजारी युवा संघटन च्या माध्यमातून मागील पंधरा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात नव युवकांची फळी तयार केली आहे. धनराज गुट्टे साहेब राज्याच्या राजकारणात स्वकर्तुत्वाने सक्रिय झाले आहेत. धनराज गुट्टे साहेबांनी पाथर्डी तालुक्यातील तुळजवाडी येथे सदिच्छा भेट दिली असता येथील ग्रामस्थांनी त्यांचा निवडी बाबत सार्थ अभिमान म्हणून सत्कार आयोजित केला होता यावेळी उपस्थित भागवत गर्जे, बप्पा ढोले, संदीप गर्जे, गोवर्धन ढोले ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोले, सोमा कराड ,नितीन गर्जे, परसराम गर्जे, लक्ष्मण सांगळे ,अशोक गर्जे, शहादेव जायभाय यांनी गुट्टे साहेबांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या . सत्कार समारंभ वेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..