महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२०:-येथील तालुका क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी बाजी मारली असून ते आता जिल्हा स्तरावर खेळणार आहेत.बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने आणि बुद्धीबळ स्पर्धेत १७ व १९ वर्षांखालील खेळाडूंनी विजय प्राप्त केला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. हे सर्व खेळाडू आता जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.लोकमान्य विद्यालयाच्या बॅडमिंटन विजेत्या संघात झेबा अली, खुशी सिडाम, वसुधा तिखट, श्रावणी गुंडावार, धनश्री गाथाडे यांचा समावेश आहे. तर बुद्धीबळ विजेत्या खेळाडूंमध्ये माही शेंडे, वैभव ससाने, पलक चंडेलवार आणि अनामिका कापसे यांचा समावेश
आहे. या सर्व विजयी खेळाडूंचे लोकमान्य विद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंदाने अभिनंदन केले आहे. हे सर्व यशस्वी खेळाडू आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक शिक्षक प्रा. पवन गौरकार, प्रा. किशोर किरमिरे, विकास मोहिते, भारती येरेवार आणि मिनाक्षी वासाडे यांना देतात.