सुरेश नारायणे
तालुका प्रतिनिधी नांदगाव
नांदगाव : शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के इतके मतदान झाले होते. तर सकाळी अकरा वाजेपर्यंत २३.१६ टक्के मतदान झाले होते. त्यात नंदुरबार २६.३५, धुळे २६.६५, जळगाव २०.०५ नाशिक २५.२२ आणि नगरमध्ये १९.९१ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघात ४३.४७ टक्के मतदान झाले आहे. यात नाशिक ४५.४४ नंदुरबार ५०.७७, धुळे ४७.२५, जळगाव ४०.७५ आणि नगरमध्ये ३८.६४ टक्के मतदान झाले आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील ६९ हजार ३६८ मतदारांपैकी दुपारी एक वाजेपर्यंत ३० हजार १५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शिक्षक मतदारांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान आहे. नांदगाव केंद्रात शिक्षकांची मतदानासाठी मोठीच मोठी रांग होती. नांदगाव केंद्रात १०८० मतदारांपैकी दुपारी तीन वाजेपर्यंत ५४० मतदारांनी मतदिनाचा हक्क बजावला आहे. नांदगाव केंद्रात एकूण मतदानापैकी ५०% मतदान झाले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)