सुरेश नारायणे तालुका प्रतिनिधी नांदगाव
नांदगाव:नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील /कळमदरी जामदरी गावात चक्क गावकर्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता या गावात पायभूत सुध्दा नसल्याने ग्रामस्थांनी हा एल्गार पुकारला होता.! जोवर विकास होत नाही तोवर मतदान करणार नाही अशी भुमिका गावकर्यांनी घेतली होती.!अनेक वर्षांपासून गावातील प्रश्न प्रलंबितचं असल्याचा आरोप गावकर्यांनी केल्या नंतर तात्काळ त्यांच म्हणणे ऐकण्यासाठी नांदगाव तहसीलदार सुनिल सौंदाने यांनी तात्काळ गटविकास अधिकारी,पोलिस निरीक्षण, ग्रामसेवक,तलाठी,कोतवाल,सरपंच,उपसरपंच,या सर्वांना सोबत घेऊन खडके वस्ती येथे भेट दिली असता त्यांना आश्वासन दिले व मतदानावर बहिष्कार टाकु नका मतदानाचा हक्क अधिकार या बाबत माहिती दिली व तहसील कार्यालयात बोलवले व तात्काळ रेशनकार्ड,वाटप करण्यात आल्यानंतर समस्यांचे निराकण झाले तसेच ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेलता आहे असे समजते या प्रसंगी तहसीलदार सौंदाने यांनी शेखर पगार यांच्यासह आलेल्या ग्रामस्थांना आम्ही भारताचे नागरिक लोकशाही वर निष्ठा ठेऊन या द्वारे प्रतिज्ञा करतो की,आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे पालन करू,आणि शांततापूर्ण निवडणुकीचे पवित्र राखत कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा सर्वांना दिली.तसेच इतर जातीचे दाखले फक्त महसुल विभागाशी संबधीत असलेले कामे लवकरच सोडवण्यात येतील असे देखील आश्वासन दिले आहे सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार यांचे आश्वासनावर विश्वास ठेवून टाळ्यांच्या गजरात आभार मानले आहे.यावेळी जामदरी कळमदरी गावातील लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.