नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर – शहराला तेलंगणा व आंध्रप्रदेश या दोन राज्याच्या सीमा लागून असल्यामुळे हिमायतनगर शहरातून मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असते. याची माहिती ठेवून हिमायतनगर पोलिसांनी आज दिनांक २ मे च्या दुपारी आयटीआय कॉलेज मार्गे हिमायतनगर शहरात भरधाव बोलेरो पिकप वाहनाने गोवंश येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी शहरात सापळा रचून तीन बोलोरो पिकप पकडून त्यातील गोवंश घेऊन जाणाऱ्या गाड्या त्यांनी पकडल्या. त्यामुळे अंदाजे १५ गोवंशाचे प्राण हिमायतनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचल्याचे शहरात बोलल्या जात आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर पोलीस हे सध्या ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे .गोवंश तस्कराविरोधात हिमायतनगर पोलिसांची या मागील दोन महिन्यात ही तिसरी कारवाई असल्याचे शहरात बोलल्या जात आहे .गत काही दिवसांपासून हिमायतनगर शहरातून तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गोपनीय माहिती येत आहे. काल दिनांक २ मे रोजी हिमायतनगर पोलिसांनी शहरात पुन्हा सापळा रचत आयटीआय कॉलेज मार्गे शहरात येत असलेल्या तीन बोलेरो पिकप वाहनाना पकडून त्यांना हिमायतनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामध्ये अंदाजे १५ गोवंश कत्तलीसाठी जात असल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली याबाबत हिमायतनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांना ह्याची विचारणा केली असता आत्ताच कारवाई करण्यात आली आहे . संबंधित गाडीवर व गाडी चालकावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे हिमायतनगर पोलिस निरीक्षक यांनी सांगितले आहे.