विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड:तालुक्यातील मौजे धानोरा सा येथील तरुण शेतकऱ्याने रेशीम शेती मधून कमावले लाख रुपये.एकीकडे शेती परवडत नाही पाणी नाही कडक उन आहे मार्केट जवळ नाही असे अनेक कारणे सांगून शेतकरी टाळाटाळ करत असताना सुशील मुधले यांनी कडक उन्हामध्ये लाख रुपये कमवले आहेत .यांचे हे उत्पन्न बघून सुशील मुधले यांचे कौतुक केले जात आहे.गावातील सर्व कामामध्ये अग्रेसर असणाऱ्या या जिगरबाज शेतकऱ्याने तरुण पिढी समोर एक उत्साहाचे वातावरण तयार केले आहे.त्यांच्या या कार्यामुळे अनेक शेतकरी रेशीम शेती करण्याकरिता तयार होतील अशी अपेक्षा आहे.