सुरेश हिरवे.ग्रामीण प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा शिरूर रस्त्यावर ढवळगाव शिवारात आज दुपारी तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान एसटी बस आणि एर्टिगा कार यांच्यात समोरा समोर झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहेप्राथमिक समजलेल्या माहितीनुसार सदर इर्टिगा कार ही पारगाव सुद्रिक येथील असून त्यातील लोक हे आळंदीवरून देव दर्शन करून श्रीगोंद्याकडे येत होते तर श्रीगोंदा डेपोची श्रीगोंदा शिरूर एसटी बस शिरूरकडे जात असताना ढवळगाव च्या अलीकडे एका चारीवर समोरासमोर ही धडक झाल्याची माहिती मिळत आहे या अपघातात कार व एसटी बस चे मोठे नुकसान झाले असून बस मधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समजली आहे .हा अपघात एवढा भीषण होता कि इर्टिगा कार मधील दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण उपचारासाठी दवाखान्यात नेल्यावर मयत झाले या गाडीतील तीन जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शिरूर येथे उपचार सुरु आहेत अपघात झाल्यानंतर घटनास्थळी स्थानिक लोकांनी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरु केले जखमीना उपचारासाठी दवाखान्यात नेले बेलवंडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे यातील मयत हे अंदाजे ५० ते ५५ वर्ष वयोगटातील असून पारगाव येथील असल्याची माहिती समजतं आहे देवदर्शन करून परतत असताना अशी दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.











