परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
केळापूर : तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो. पांढरकवडा आदिलाबाद महामार्ग क्रमांक ४४ वरती पिंपळखुटी चेकपोस्ट आहे .महामार्ग म्हंटल्यावर लाखो वाहने दिवसरात्र येणे जाने सुरूच असते.. आणि अनेक वाहने या महामार्ग वरून तस्करी करतात. या तस्करीच्या वाहनांना मूक संमत्ती देऊन दिवसभरात लाखो रुपयाचा गल्ला जमा केल्या जातो.. हि वसुली करण्यासाठी काही खाजगी पंटर ची नेमणूक केलेली आहे .हे खाजगी पंटर अवैध वसुली करतात.. येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक अमरावती येथून केल्या जाते.. अवैध्य वसुली संदर्भात कोणी तक्रार केल्यास तक्रार करणाऱ्या व्यक्तीची बोलती बंद करण्यासाठी साम,दाम ,दंड ,चा वापर केल्या जात असतो. त्याच बरोबर अवैध्य केलेली वसुली खालून तर वरपर्यंत पोहचविण्यात येते .