रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
स्थानिक सदाशिव संस्थान येथे हिवरखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सुरजबाई शर्मा यांनी मूक जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी स्वखर्चाने धर्माळ बांधकाम करून ते जनावरांच्या सेवेत सुरू केले आहे. या धर्माळा साठी सुरजबाई शर्मा यांनी अंदाजे 1.लाख रुपये एवढा खर्च कुठलीही देणगी न घेता श्री सदाशिव संस्थान शिव मंदिर बांधकाम समिती व शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर केला आहे. नुकतेच सदर धर्माळ जनावरां च्या सेवेत सुरू केले असून हिवरखेड- चिचारी या रस्त्यावरील व परिसरातील सर्वच मूक जनावरांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यानिमित्त श्री. सदाशिव संस्थान शिव मंदिर चे जिर्णोद्वार नंवीन भव्य असे मंदीर बांधकाम लोकसह भागातुन होत आहे. मूक जनावराची पिण्याच्या पाण्या ची सोय करून दिली म्हनून श्री सदाशिव सस्थांन शिव मंदीर बांधकाम समिती च्या वतीने श्रीमती सुरजबाई शर्मा व त्यांचे सुपुत्र संतोष शर्मा यांचा छोटे खानी सत्कार घेण्यात आला यावेळी समिती चे माजी जी. प. सदस्या सुलभा दुतोंडे,गोकुळा भोपळे, प्रतिभा येउल,रमेश दुतोंडे,धन्नूभाऊ टावरी, पुरुषोत्तम गावंडे,गजानन दाभाडे, गणेश वानखडे, अनिल कराळे,महेंद्र भोपळे, संदिप इंगळे, महेंद्र कराळे सर,वीरेंद्र येउल,संजय हिवराळे,देवेंद्र राऊत, रवी वाकोडे,प्रमोद निळे, रामदास गावंडे, विनोद धबाले,केशव कोरडे, मनोज शर्मा ईत्यादी सदस्य उपस्थित होते.या सत्काराचे संचालक महेंद्र कराळे सर यांनी प्रास्ताविक रमेश दुतोंडे यांनी तर आभार संदिप इंगळे यांनी केले.