रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
जगतगुरु प्रबोधन मंडळ तेल्हारा द्वारा सकल कुणबी समाजातील दहावी, बारावी, जेईई तसेच नीट परीक्षेत प्रविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच उंबरकार कॉम्प्लेक्स तेल्हारा येथे अतिशय उत्साहा त संपन्न झाला.वसंतराव अवचार यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटक वासुदेवराव निंबोकार होते तर महादेवराव पोटे, शंकरराव डोंगरे गुरुजी, सखारामजी कानतोडे, वासुदेवराव नळकांडे, शंकरराव पुंडकर, रमेश दुतोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष पूजनाने करण्या त आली तर मान्यवरांचा सत्कार सुद्धा वृक्ष देऊन करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वरजी फुंडकर यांनी तुमच्या इच्छा मुलांवर लादू नका तर त्यांना स्वइच्छेने त्यांचे क्षेत्र निवडू द्या असे आवाहन पालकांना केले तर गृह मंत्रालय मुंबई येथे कार्यरत अभिषेक गायकवाड यांनी स्वतःचा संघर्ष सांगत यश कसे मिळवावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. मंचावर उपस्थित मान्यवरा सोबत शंकरराव खुमकर, डॉ. बाबुरावजी शेळके, प्रकाशजी वाकोडे,गजाननराव नळकांडे, अनंतराव अवचार, अरविंदजी तिव्हाणे, केशव राव ताथोड, महादेवराव महाले, सौ. जयश्री ताई लांडे, सौ. जयश्री ताई घंगाळ इत्यादी मान्यवरांच्या हस्ते 46 विष्यार्थ्यांना स्व. जयदेवराव कराळे स्मृती सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ.देवकाबाई घंगाळ यांचा मंडळाच्या वतीने डॉ. सौ. वाकोडे मॅडम व माहोकार ताई यांनी सत्कार केला. मंडळाला मागील कार्यक्रमात भरीव सहकार्य केल्याबद्दल मंडळाच्या वतीने मनोहरराव खोटरे, गणेशराव तिव्हाणे, प्रविण बुरघाटे, दिलीप बाळापुरे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी 91 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 22 विध्यार्थ्यांना सौ. देवकाबाई घंगाळ यांनी प्रत्येकी एकशे एक रुपयांचे बक्षीस दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल सुरे, प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव राजेश बुरघाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी जगतगुरु प्रबोधन मंडळाचे मार्गदर्शक, सल्लागार आणि सदस्यांनी प्रयत्न केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)