रितेश टीलावत
जिल्हा प्रतिनिधी अकोला
हिवरखेड येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती समारोहाचे आयोजन करण्या त आले होते. या समरोहाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्यामशिल भोपळे,जेष्ठ संचालक प्रकाशचंद्र खोब्रागडे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे,प्राचार्य संतोषकुमार राऊत हे होते.यावेळी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन केले.या समारोहा चे संचलन पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी केले. यावेळी शाळेचे समस्त शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.