देवलाल आकोदे
सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद जवळील मौजे खंडाळा येथील अमोल भास्कर सोनोने यांची जळगाव जिल्ह्यात जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार मा जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू फुके,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव वैष्णव,रमेश पाटील दानवे,माजी सरपंच बाबुराव सोनोने,प्रतिष्ठित व्यापारी दत्तात्रय पाटील सोनोने,गावचे उपसरपंच सुभाषराव पाटील सोनोने,भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघ ग्रामीणचे उपाध्यक्ष देवलाल आकोदे,सुधाकर सोनोने यांनी गावात जाऊन सत्कार व अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आमोल सोनोने हे गावचे माजी सरपंच भास्करराव पाटील सोनवणे यांचे चिरंजीव आहेत.


