सुशांत कदम
प्रतिनिधी,ठाणे
उद्या दिनांक २१-०८-२०२३ पासून आझाद मैदान या ठिकाणी “महाराष्ट्र होमगार्ड (गृहरक्षक) दल यांच्या मार्फत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासून असणारी ही संघटना. आज अमृत महोत्सव (७६) या स्थितीवर असताना देखील होमगार्ड दलाच्या जवानांना कायमस्वरूपी ड्युटी व मनासारखा मानधन मिळत नसल्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील होमगार्ड जवानांन मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मागण्या ३६५ दिवस कायमस्वरूपी नोकरी व मानधनात वाढ व विविध मागण्या आहेत. उद्याच्या आमरण उपोषणात शासनाला व प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने होमगार्ड जवान “आझाद मैदान”(मुंबई) या ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहे.


