सुशांत कदम
ब्युरो चिफ, ठाणे
पनवेल : शहर पोलीस ठाणे नवी मुंबई उत्तर प्रदेश येथील यूपी सरकारचे एकूण 33 गंभीर गुन्हे दाखल असलेला तसेच उत्तर प्रदेश सरकारचे 50 हजाराचे बक्षीस जाहीर असलेला फरार आरोपीत नामे हरीश उर्फ छोटू अब्दुल अजीज रा.मुडियार,पोलीस ठाणे फुलपूर,आजमगड उत्तरप्रदेश यांस पनवेल शहर पोलीस व उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वाराणसी यांचेसह संयुक्त कार्यवाहीत अटकेची कारवाई करण्यात आले..
पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी पोउपनि/ विनोद लभडे व पोलीस अंमलदार पोहवा /९३५नितीन वाघमारे,पोहवा / १३७८ अविनाश गंधडे,पोहवा / ३०२६ यशवंत झाजम, पोना / २२३९अशोक राठोड,पोना / माधव शेवाले व पोलीस मित्र राहुल राठोड व सुशांत कदम यांचे खास पथक तयार करून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, वारणासी यांच्याकडील उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त केली प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे खास पथक तसेच उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर चे डिवायएसपी / श्री. शैलेंद्र सिंग, पोलीस निरीक्षक /श्री. अमित श्रीवास्तव, पोउपनि / ज्ञानेन्द्र सिंह, पोउपनि / शहजादा पोहावा / दिलीप कश्यप, पोशि / रविशंकर सिंह यांच्यासह संयुक्त कारवाई करून आरोपीत यांस ताब्यात घेण्यात आले आरोपीत यास अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता सदरील आरोपीत हा मागील सुमारे दोन महिन्यांपासून नवी मुंबईमध्ये ओला उबेर या कंपनीमध्ये स्वतःकडे कोणताही अधिकृत वाहन चालकाचा परवाना नसताना देखील त्याचे भावाचे वाहन चालकाचा परवाना व नाव वापरून चालक म्हणून नोकरी करीत असल्याचे दिसून आले आहे.मा. पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भांरावे, मा.सह आयुक्त श्री. संजय मोहिते, मा. पोलीस उपा आयुक्त श्री. पंकज डहाणे, मा सह.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग श्री अशोक राजपूत यांनी उत्तर प्रदेश येथील दाखल असलेल्या गुण्यातील फरार आरोपीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्वतःचे अस्तित्व लपवून राहात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदरील आरोपीत यास उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वाराणसी युनिट यांचे सह संयुक्त कार्यवाही करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे सूचना दिल्या आहेत.


