अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून मतदार संघातील महिलांना नवरात्रीमध्ये नवसाला पावणारी मोहटा देवी दर्शन यात्रा घडून आणली जाते. या यात्रेचे नियोजन 200 ते 250 बस च्या माध्यमातून नऊ दिवस केले जाते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा पद्धतीचे नियोजन केले असून भाविक भक्तांना तिसगाव येथे जेवण व आराम करण्याची सुविधा उपलब्ध केली असून नऊ दिवसात लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेणारा असून सध्या पाथर्डी मध्ये व मोहटादेवी गडावर देवी भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आमदार निलेश लंके नऊ दिवस मोहटादेवी गडावर उपस्थित राहून सर्व भक्तांची सेवा करत आहेत.


