प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१६ ऑक्टोंबर सोमवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजास सरकारने द्यावे यासाठी पालम येथील पदुदेव उर्फ रामराव दिनकरराव जोशी व अनंत उर्फ अविनाश देविदास राव जोशी यांनी आझाद मैदान मुंबई येथे ब्राह्मण समाजास आर्थिक विकास महामंडळ द्यावे . यासाठी दि.१६ ऑक्टोंबर पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आज पर्यंत विविध संघटना ,संघ यांच्यावतीने अनेक वेळा निवेदने दिले. आंदोलने पण केले पण कोणत्याही सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या अर्जांना व मागण्यांना सरकारने केराची टोपली दाखवली आहे .आज ब्राह्मण समाज मोठ्या वाईट परिस्थिती मधून जात आहे. समाजात नोकरी नाही व्यवसाय नाही ब्राह्मण समाजाला कुठलीही सरकारची सुख सुविधा नाही .यामुळे ब्राह्मण समाजातील तरुण मुले बेकार राहत आहेत .त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे तरुण मुलांना काय करावे हे सुचत नसल्यामुळे कित्येक तरुणांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत. नोकरीवव्यवसाय नसल्यामुळे मुलांचे विवाह होत नाहीत . आई-वडिलांसमोर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज ब्राह्मण समाज हलाखीचे जीवन जगत आहे .तसेच पारंपारिक पुरोहित त्याचा व्यवसाय पण ठीक प्रकारे चालत नाही. आज पुरोहित वर्ग पण शिकून स वरून कामाच्या प्रतीक्षेत असतात तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे पौरहित्य करणाऱ्या ब्राह्मणांना मानधन चालू केले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात पण मानधन चालू करावे व समाजावर ते सतत चिखल फेक होत असते ती पण थांबवण्यात यावी यासाठी अशा विविध मागण्या व ब्राह्मण समाजास परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी हे उपोषण करत आहेत .मागील अधिवेशनात ब्राह्मण समाजाला आशा होती की सरकार आपल्याला मागील बऱ्याच दिवसापासून केलेल्या मागण्यांमुळे परशुराम आर्थिक विकास महामंडळ देईल. पण सरकारने बऱ्याच समाजांना महामंडळेदिली पण ब्राह्मण समाजाला काहीही दिले नाही .ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्षवेधावे यासाठी पालम येथील पदुदेव जोशी, व अविनाश जोशी हे अमर उपोषण करत आहेत. या यांच्या उपोषणाला समाजातून विविध संघटनांनी व समाज बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे. पालम येथून साफल्य ग्रुप अमोल सुपेकर व समाज बांधव ,तसेच परशुराम संस्कार सेवा संघ लातूर, महाशक्ती फाउंडेशन बोल्हे गाव अहमदनगर, येथून अँड. अतुल सुरेश सुपेकर व सर्व समाज बांधव, साखरकर हॉस्पिटल पालम डॉ. चेतन जयकुमार साखरकर व सर्व समाज बांधव, विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश केदारे पाथरी, वि.व्या. ब्रा.ए. महासंघ प्रभारी विठू गुरु वझरकर परभणी, सुधाकर गुरु परभणी, जिंतूर येथून शंकर काका जोशी व सर्व समाज बांधव जिंतूर, वि.व्या. ब्रा.ए. महासंघ नंदुरबार येथून अरविंद इंगळे व समस्त समाज बांधव, विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ पानगाव मकरंद जोशी व सर्व समाज बांधव पानगाव लातूर, हिंगोली येथून पद्माकर केदारे व सर्व समाज बांधव, ढोकी व तेर येथून पंकज देशपांडे व सर्व समाज बांधव, सेलू येथून गोविंद जोशी मनोज दीक्षित व सर्व समाज बांधव, माजलगाव येथून अमोल मुळे व सर्व समाज बांधव, संपर्क मित्र मंडळ परभणी, विप्रसंग पाथरी येथून डॉ. उमेश देशमुख ,डॉ. ल.ना. बोरगावकर, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ.ल.रा. मानवतकर, डॉ.आर.आर. मानवतकर, अँड. मुकुंदराव चौधरी, अँड. कोंत., अँड. बी.बी .तळेकर, अँड. टी.बी कुलकर्णी, प्रवीण बाबळगावकर, नितीन पाटील, वैभव मुळे, विष्णू पाथरीकर, सुशील शेवाळकर, अरुण दैठणकर प्रशांत चौधरी, कल्याण चौधरी, आलोक चौधरी, व सोनपेठ येथून सर्व समाज बांधव, बीड, परळी, गंगाखेड, नांदेड, मानवत, परतुर, आष्टी, जालना, संभाजीनगर येथून अनेक ब्राह्मण संघटना यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळण्यासाठी उपोषणास पाठिंबा दिला आहे.


