रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
चित्रपटातील हिरो आणि हिरोइन हे फक्त अभिनेते असून आपल्याला घडवणारे आपले आई वडील हेच आपले खरे हिरो असतात असे प्रतिपादन डॉ.संतोष गायकवाड यांनी केले.श्री अंबिकादेवी विद्यालय सौन्दळा येथे ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त आयोजित बचाव स्पर्धेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की जे आपल्याला विधायक कार्य करण्यास प्रवृत्त करतात व विघातक कार्य करण्यापासून रोखतात तेच खरे हिरो असतात.शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ए. पी.जे अब्दुल कलाम, शाहू महाराज, गाडगे महाराज यासारख्या हिरोमुळेच हा देश घडला असे त्यांनी सांगितले.श्री अंबिकादेवी विद्यालयात कलाम जयंतीनिमित्त बचाव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत माध्यमिक गटातून कु.भक्ती मनोज म्हसाये, कु.नंदिनी विठ्ठल तिखट व कु.कल्याणी परशुराम तायडे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर प्राथमिक गटातून कु.मानवी गोपाल खिरसान प्रथम,अविराज महादेव बेराळे द्वितीय तर कु.संस्कृती उमेश खाडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.यावेळी डॉ.संतोष गायकवाड यांनी इंग्रजी विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा शॉल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रदिप खुपसे सर होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र कराळे, सूत्रसंचालन विलास घुंगड तर आभार प्रदर्शन राजेश टाले यांनी केले.बचाव स्पर्धेचे परीक्षण शैलेश तराळे,प्रविण चांदूरकार व तुषार कोल्हे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी रामदास सांगोळे, विकास घोले यांनी परिश्रम घेतले.