मोहसिन शेख
शहर प्रतिनिधी वसमत
वसमत : दि.१८/०८/२०२३ रोजी “आझादी का अमृत महोत्सव” निमित्त वसमत येथील मोंढा परिसरात बांधकाम कामगार म्हणून वंचित असलेल्या पेंटर कामगारांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेवून त्यांना अनुभव पुस्तिकांचे १२७ कामगारांना वाटप करण्यात आले. आयोजित मार्गदर्शन शिबिराला सरकारी कामगार अधिकारी श्री. टी. ई. कराड यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी नोंदणी अधिकारी श्री. एन. एस. भिसे गजानन पवार माहाराष्ट्र पेंटर यूनियन संगठन चे संस्थापक अध्यक्ष नसीर भैय्या माहाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र ठाकुर जिल्हा अध्यक्ष मुजीब भाई T अध्यक्ष बाडू मोर शेख साबेर मुमताज खान राजा धळके शेख सदाम अबदुल खयुम शेख नासर शेख मुखीद शेख जमीर गणेश कुलकर्णी इतर कामगार उपस्थित होते.


