शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
नांदुराः जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे जिगाव नवीन गावठाणात रहिवासासाठी प्लॉट)भूखंड न मिळाल्यामुळे जिगाव वासीयांनी या झालेल्या अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती .
सदर उपोषणाबाबत आ राजेश एकडे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने उपोषण मंडपाला भेट देत संबंधीत उपोषण कर्त्यांसह जिल्हाधिकारी डॉ ह.पी. तुम्मोड यांची भेट घेत सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी यांनीही सकारात्मक प्रतिसाद ३१ऑगस्ट पर्यंत भूखंडाचे वाटप करण्यात येईल असे उपोषणकर्त्यांना आश्वस्थ असून. याप्रसंगी आमदार राजेश एकडे यांनी उपोषणकर्त्यांना निंबू शरबत देऊन उपोषण सोडवले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा)वसंतराव भोजने,शेंबा सरपंच अँड नंदकिशोर खोंदले,कृउबास चे संचालक भानुदास तितरे व मंगेश भिडे यांची उपस्थिती होती.