सय्यद रहीम राजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड तालुक्यातील सुकळी जहागीर येथील इमाम आहेमद रजा चौक येथील खांबावरील इलेक्ट्रिक लाईट गावातील वड्या काटे च्या अलीकडले खांबावरील लाईट समाज मंदिर च्या पुढच्या खांबावरील लाईट एका महिन्यापासून बंद आहे.याकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत दिसत आहेत.खांबावरील इलेक्ट्रिक लाईट जवळपास एका महिन्यापासून बंद आहे. ग्रामपंचायत कर्मचारी याच चौकातून येजा करतात परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही अंधारामुळे अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता ना करता येत नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून बंद पडलेले खांबावरील इलेक्ट्रिक लाईट तत्काळ सुरू करावी तसेच पावसाळ्या सुरू झाला असून पावसाळ्यात नाल्यात अडकलेल्या कचरा काडी रस्त्यावरील सुखा ओला कचरा याकडे सुद्धा ग्रामपंचायतने लक्ष द्यावे. अशी समस्त नागरिक मागणी करत आहेत.


