किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
‘वाचनयात्रे’ने केले महामानवास अभिवादन’
पातुर : शिर्ला (अंधारे) आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिना चे औचित्याने येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाने वाचनालयात ‘वाचनयात्री’ या कार्यक्रमाचे आयोजन करून महामानवास अभिवादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे तर प्रमुख पाहुणे म्हणून ठा. शिवकुमारजी बायस होते. प्रतिमा पूजन तथा दीप प्रज्ज्वलानंतर मान्यवरांचे स्वागत केले. साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेनंतर डॉ शेषराव इंगळे यांनी प्रास्ताविक केले ठा. शिवकुमार बायस यांनी डॉ बाबासाहेब यांनी केलेला जीवन संघर्ष सांगून ते कसे वाचनयात्री होते हे सांगितले. याप्रसंगी जनार्दन इंगळे( मेजर )दामोदर अंधारे निर्भय पोहरे उपसरपंच सौ कल्पना ताई खर्डे रामकृष्ण खंडारे यांनी आपले मनोगतामध्ये डॉ. बाबासाहेबांच्या विद्वत्तेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला रामायणाचार्य महादेव महाराज यांनी संचालन करताना बाबासाहेब परिस होते असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात नारायण अंधारे यांनी समतेचे महाकाव्य या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील प्रथम खंडातील काही निवडक कवितांचे वाचन केले. त्यात सुरेश भट, प्रकाश अंधारे, विठ्ठल वाघ, श्रीकृष्ण राऊत, नारायण अंधारे यांच्या कवितांचा समावेश होता.सदर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच अर्चनाताई शिंदे, उपसरपंच कल्पनाताई खर्डे, सदस्य उमाताई अंधारे, रेखाताई गवई, प्रमिला अंधारे ,आशाताई अंधारे, सौ निर्मलाताई राऊत, वीरपिता काशीराम निमकंडे, पत्रकार किरणकुमार निमकंडे, डॉ विलास हिरळकार प्रल्हाद गवई, मंगल डोंगरे ,सुधाकर शिंदे, फिरोज खान , इमरान खान डी. एस. इंगळे, गजानन भाजीपाले ,देविदास निमकंडे ,एलाप्पा खर्डे, रामदास सावरकर, अनंत अंधारे ,गजानन अंधारे, श्रीकृष्ण. रा. अंधारे आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.