किरणकुमार निमकंडे / जिल्हा प्रतिनिधी, अकोला
पातूर : दि : 06/12/2021 वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. तद्नंतर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. प्रणाली सिरसाट हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भावपूर्ण गीत गायन करून शब्द सुमनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या अखेरीस विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मौन बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य एस.एम. सौंदळे,पी.जे.राठोड, ए.व्ही. सोनटक्के, प्रा.जे.डी. भारस्कर, प्रा.व्ही.आर.थोरात, प्रा.आर. एम. बचाटे, प्रा.एस.टी. गाडगे, प्रा.एस.बी.आठवले, जी. एन. राऊत, सी. ए. वाघ, आर. ए. जाधव, आर.एस.देशमुख, के.डी. लोखंडे, एस. एच. जाधव,नेहरु युवा केंद्राचे विशाल राखोंडे, पल्लवी राखोंडे, पत्रकार अविनाश पोहरे, निखिल उपर्वट, एस.बी. पोहरे, बी.डी. राठोड, जे. के. खुळे, पी. एस. शेगोकार, डी.जे.राजनकर, व्ही.डी. राठोड, बी.बी.आडे,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस.टी.गाडगे यांनी केले तर मान्यवरांचे आभार युवाश्री विशाल राखोंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.