सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : अनसिंग, येथील श्री पी.डी. जैन कला महाविद्यालययात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अभिवादन करून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेक गुल्हाने तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गजानन बनचरे उपस्थित होते. प्रथम डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बीए भाग 3 चा विद्यार्थी आकाश घटमालने आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाची प्रेरणा म्हणून, मानवतेचे उद्धारक म्हणून आम्हा साठी खूप मोठी प्रेरणा असल्याचे त्याने नमूद केले. याचवेळी प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव,लोकशाही व कायद्यापुढे सर्वांना समानता यासारख्या महत्त्वपूर्ण मूल्ल्याच्या माध्यमातून भारताला वैभवशाली राष्ट्रनिर्माण करून देण्यामध्ये बाबासाहेबांचा मोठा वाटा आहे. सोबतच दलित वंचित, स्रीआदि बहुजन सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्यामध्ये डॉ. आंबेडकर हे सर्वात पुढे असलेलं मोठे व्यक्तीमत्व असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अशा महामानवापासूनच प्रेरणा घेऊन आपणही मोठे झालो पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी ऋषिकेश जोगदंड, गणेश चिखलकर, सौरभ नवगनकर, साहिल गोटे आदि विद्यार्थ्यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रमाधिकारी डाँ. सचितानंद बिचेवार, डाँ. अनिल जैन,डॉ. हरीश घोडेकर, ऋषभ महेशकर आदि प्राध्यापक- कर्मचारी उपस्थित होते.