सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- श्री .प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राठोड यांनी आपल्या प्रस्तावनेतून पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने सर यांनी एक पेड मा के नाम या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास या उपक्रमाला एक चळवळीचे स्वरूप प्राप्त होईल आणि नवीन पिढीला वृक्षारोपणासाठी प्रेरणा मिळेल. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वयक प्रा. बनचरे यांनी पर्यावरण समतोलनासाठी वृक्षारोपणाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर अभिनव उपक्रम केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक पेड मा के नाम हा उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रा. बीचेवार सरांनी भावी पिढीच्या अस्तित्वासाठी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यामुळे एक पेड मा के नाम या उपक्रमाला जागतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.