दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
रिसोड : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय रिसोड येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषि औद्योगिक जोड २०२३-२४ या अंतर्गत सवड येथे निंबोळी अर्क कसा बनवायचा त्याचा पिकाला कसा व किती फायदा होतो याबद्दलचे सविस्तर माहिती कृषी दुतांनी दिली. सदरील प्रात्यक्षिकं कार्यक्रम साठी सर्वप्रथम गावचे प्रथम नागरीक विलास शेळके सरपंच व इतर मान्यवर यांचे शुभ हस्ते कृषि रत्न डॉ.पंजाबराव देशमुख व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमांचे प्रस्ताविक प्रा. दिपक मसुरकर कार्यक्रम समन्वयक रावे यांनी मांडले. कु.किरण जायभाये समवेत कृषी कन्या कृषि महाविद्यालय रिसोड यांच्या व्दारे निबुळी अर्क बनविणे प्रात्यक्षिक करून दाखविले यावेळी कृषि महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थीनी किरण जायभाये सेजल घुगे अमिषा बघेले अनुजा वाघमारे मेघा कांबळे मनीषा राठोड त्याच बरोबर, ग्रामपंचायत सवडचे सरपंच श्री विलास शेळके , उपसरपंच दशरथ मोरे ,पोलीस पाटील रमेश लाटे, जि. प्र. शाळा सवडचे मुख्यध्यापाक संतोष संपकाळ सर , नारायण नागरे संजय राऊत प्रकाश मस्के सुरेश दवांदे गजानन लाटे, सुरेश दवांदे गजानन लाटे ,घोडे सर व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी महाविद्यालय रिसोडचे प्राचार्य डॉ. आशिष अप्तुरकर, तांत्रिक समन्वयक कषि महाविद्यालय रिसोड सन्माननिय आर. एस. डवरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. डी. मसूरकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. वाय. सरनाईक व तसेच विषय विषेशतज्ञ प्रा. डि. टी. बोरकर, प्रा . मनोज जाधव व तांत्रिक संयोजक प्रा. गोहाडे मॅडम तथा समस्त प्राध्यापक कृषि महाविद्यालय रिसोड यांची उपस्थिती लाभली.विशेष तांत्रीक समन्वयक श्री आर. एस डवरे यांनी पिकं संरक्षण व कामगंध सापळा, हळद, तूर सोयाबीन पीक साठी मोलाचं मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी श्री.संतोष सपकाळ सर मुख्याध्यापक जी.प.शाळा सवड यांनी मनोगत व्यक्त केले.संपूर्ण सूत्रसंचालन कु.अमिषा बघीले हिने केले तर आभार प्रदर्शन कु.अनुजा वाघमारे हीने केले.सदरील प्रात्यक्षिकं करीता समस्थ ग्रामस्थ सवड, व जी. प. प्राथमिक शाळा बेवस्थापण समिती सवड कर्माचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.