कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद : शहरातील पूस नदी तीरावर असलेल्या पिंपळ वृक्ष नागनाथ मंदिरामध्ये पंचामृत रुद्राभिषेक करून श्रावण मासाची सुरुवात करण्यात आली. ईटावा वार्ड पुसद मधील प्रतिष्ठित नागरिक अनिल चव्हाण .पाटील, विष्णू शिकारे, अरुण निकम, सचिन तांगडे, गणेश झळके, कैलास वैरागडे, सतीश पंडितकर, सनी रॉय, पिंटू शेंडगे आदींच्या हस्ते पिंपळवृक्ष नागनाथाचे पंचामृत अभिषेक श्रावण मासाचे पहिल्या सोमवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आले. पूस नदीचे तीरावर असलेल्या पिंपळ वृक्ष नागनाथ मंदिरामध्ये श्रावण मासाचे पहिल्याच सोमवारी भाविक भक्तांनी सकाळी सहा वाजेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. श्रावण मासाचे पहिल्या सोमवारी पिंपळ वृक्ष नागनाथ मंदिरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद,यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुख उमाकांत पापिनवार,पुसद तालुका शिवसेनाप्रमुख संजय बयास, पुसद शहर शिवसेनाप्रमुख दीपक उखळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद तसेच फळांचे वाटप करण्यात आले. पूस नदी तीरावर असलेल्या पिंपळ वृक्ष नागनाथ मंदिरामध्ये श्रावण मासाच्या पहिल्याच सोमवारी भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. पूस नदीचे तीरावरील पिंपळ वृक्ष नागनाथ मंदिरामध्ये श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी भाविकांना नागनाथाचे दर्शन होण्याचे दृष्टीने तसेच महाप्रसादाचे वाटपा करिता प्रचंड उसळलेल्या गर्दीला शांततेत महाप्रसादाचा योग्य लाभ मिळण्याकरिता नितीन भोयर, अक्षय जगताप, पिंटू शेंडे, रामा गोलाईतकर, संजीव चौरे, सचिन डोळस, रुषभ डोळस, चिकू तोंडारे, बंटी वाघमारे, मदी अण्णा, देवानंद दुपारते, गजानन भोगे, विकी सव्वाशे, रोहित सव्वाशे, प्रवीण यादव, ऋषिकेश भागवत, शुभम राठोड, युवराज जोशी यांचे सह ईटावा वार्ड पुसद येथील तरुणांनी अथक परिश्रम घेत पंचामृत रुद्राभिषेक सोहळा शांततेत पार पाडण्याकरिता मोलाचे योगदान दिले.


