विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: कृषी उत्पन्न बाजार इंदापूर समितीच्या उपबाजार भिगवण येथे ९ ऑगस्ट २०२३ रोजी बाजार आवारात खिलार गाई, बैल ,गिरगाई ,जर्सी गाई, मुरा व पंढरपुरी जातीची म्हैस जनावरे बाजाराचा शुभारंभ करण्यात आला होता. दर बुधवारी या ठिकाणी जनावरे बाजार भरतो या बाजाराचा बुधवार २३ऑगस्ट रोजी तिसरा बाजार होता. या वेळेस काही व्यापारी यांनी नवीन बाजारच्या तुलनेत येथे चांगला बाजार भरत असून भविष्यात गिर्हाईक वाढले जाईल तसेच येथील बाजार समिती शेतकरी व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा देत असल्याचे सांगितले तर काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाऊस लांबल्याने गिऱ्हाईक त्या प्रमाणात येत नसल्याचे सांगितले.










