हनुमान बर्वे
शहर प्रतिनिधी,वाशिम
कनेरगाव. कनेरगाव नाका येथून जवळच असलेले मोप या गावामध्ये पुरातन भवानी मातेचे मंदिर असून या ठिकाणी भवानी मातेच्या नवरात्र उत्सवा मध्ये गावकरी मंडळी खूप थाटामाटात उत्साह साजरा करत असतात व छोटे-मोठे कार्यक्रम घेत असतात यामध्ये छोटे छोटे मुली मुले दांडिया चा आनंद व नवरात्री चा उत्साह खूप चांगल्या प्रकारे नवरात्री उत्सव करत असतात व गावकरी मंडळी लहान थोराना भजन कीर्तन यामध्ये नवरात्रा मध्ये पूर्णपणे दंग होऊन जातात नागरतास मध्ये असलेले भवानी मातेचे मंदीर मोप येथे आहे अशी मान्यता गावकरी देत असतात व नवरात्री मध्ये या ठिकाण भवानी माता मंडळ खुप चांगल्या प्रकारे नऊ दिवस छोटे मोठे कार्यक्रम घेत असतात व समाजाला काही चांगले प्रबोधन मिळेल व या भावनेतून हे मंडळ व गांवकरी नेहमी च समाज कार्याच्या हिताने कोणताही स्वार्थ न साधता काम करत असतात.