विशाल कालापाड
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : जिल्ह्यातील वाघजाळी गावाला जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवा बर्डे यांनी केली आहे. वाशिम येथील अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघजाळी गावच्या रस्त्याची अगदी चाळण झाली आहे,त्यामुळे अत्यंत महत्वाचा असलेला रस्ता संपुर्ण खड्यात गेला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा. लवकरात लवकर ह्या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देवा बर्डे यांनी केला आहे.संबधीत विभागाच्या दुर्लक्षाने ह्या रस्त्याची अशी बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न केला तर,समोरील खाड्यांमधून वाहन जावून अपघात घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनचालविणे कठीण झाले आहे. लवकरात लवकर ह्या रस्त्याची दुरुस्ती ची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे परंतु अद्याप ह्या रस्त्याची बिकट स्थिती बद्दल संबंधित विभाग काय पाऊल उचलेल ह्या कडे नागरिकांची लक्ष लागले आहे.
नागरिकांना नोकरी व्यवसाय मजुरी दवाखाना शिक्षण यासाठी दररोज वाशीमला ये – जा करावी लागते.मात्र ह्या रस्त्याने दुचाकी नेनेच मोठे अवघड असुन चारचाकी वाहन घेऊन म्हणचे कसरतच आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी देवा बरडे यांनी केली आहे या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.











