अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर काल दि ९ सप्टेंबरला लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. जड अंतःकरणाने गणपती बाप्पाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.विसर्जनासाठी तेल बुदली, कापशी तलाव व एम. आय.डी.सी परिसर येथे शहरातील गणेश विसर्जन मोठया गर्दी मध्ये सुरळीत व शांततेत पार पडला.यासाठी पातूर पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार हरिष गवळी, उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी, पठाण, सहाय्यक पोलीस मीरा सोनोणे व पोलीस कर्मचारी यासह सर्व यंत्रणा सज्ज होत्या.
ठिकठिकाणी आकर्षक गणेश मूर्तिना भेटी देण्यात आल्या तसेच लहान मुलांना पोलीस स्टेशन मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलिसांसह अधिकाऱ्यांच्या मोठी फौज गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली होती. नेहमीच पोलीस कर्मचाऱ्यांच्या हक्कसाठी अहोरात्र झटणारे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन ने संपूर्ण गणेश विसर्जन मिरणुकी मध्ये चोक व कडक बंदोबस्ता दरम्यान प्रशासनाला सहकार्य करून विशेष योगदान दिले. यावर्षी पातूर शहरात 19 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी करण्यात आली आहे. चोक व कडक बंदोबस्त असून नियम अटीचे काटेकोरपने पालन करून गणेश विसर्जन प्रथमच कुठलाही डीजे न वाजवीता अगदी सुरळीतपणे, धार्मिक सामाजिक व पारंपरिक पद्धतीने शांततेत मोठ्या उत्साहाने पार पडला.