महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : भद्रावती पंचायत समितीमधील विलोडा येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक विनोद बाळेकरमरकर यांचा मुलगा वेदांत हा नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याला नीट परीक्षेत ७२० पैकी ६१५ गुण मिळाले आहेत. त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. वेदांत हा मुळातच हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याने मार्च २०२२ च्या बारावी विज्ञान परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. तसेच २०२० च्या दहावीच्या परीक्षेतही ९७ टक्के गुण मिळवून त्याने यशाचा उच्चांक गाठला होता. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आजोबा आणि शिक्षकांना देतो. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


